top of page

Blogs

०२ जानेवारी २०१४ पासून 'लोकसत्ता' मध्ये 'तत्त्वज्ञान' या विषयाची माहिती देणारे माझे 'तत्त्वभान' हे सदर सुरु झाले. एखाद्या दैनिकाने 'तत्त्वज्ञान' या विषयास इतकी मोठी जागा द्यावी, ही मराठी पत्रकारितेतील अभूतपूर्व घटना आहे. 'समाजाला तत्त्वचिंतन हवे आहे' हे भान मराठीत सर्वप्रथम 'लोकसत्ता' ने जागे केले. 'पत्रकारितेची लोकशिक्षकाची' नैतिक भूमिका सिद्ध केली. सदरातील लेख येथे उपलब्ध होतील. लेखातील व्यक्ति, घटना, संकल्पनानां महाजालातील जोडण्या देऊन लेख अधिक समृद्ध केला आहे.प्रतिक्षा प्रतिसादाची !

सकाळ वृत्तपत्र उद्योगसमूहाच्या 'अॅग्रोवन' या शेतीविषयक दैनिकात 'कथा काळ्या आईची' हे सदर मी २०१० साली लिहिले. या सदरात ३९ लेख प्रसिद्ध झाले. नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान यांचे शेतीशी कोणते नाते आहे, याची माहिती देणारे हे सर्व लेख येथे एकत्र केले आहेत.शेतीचे नीतिशास्त्र व शेतीचे तत्त्वज्ञान हा भारतात तरी अगदी नवा विषय आहे. त्याचा अद्यापि भारतीय विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या आणि शेतीविषयक अभ्यासक्रमात झालेला नाही.माझी लेखमाला हा या विषयाची ओळख करून देणारा भारतातील पहिला प्रयत्न.

येथे 'लोकसत्ता' तील तत्त्वज्ञान विषयक पुस्तक परिचय लेख आहेत.

त्याची सुरुवात विल डय़ुरांटच्या 'फॉलन लीव्हज् : लास्ट वर्ड्स ऑन लाइफ, लव्ह, वॉर अ‍ॅण्ड गॉड' या छोटेखानी पुस्तकाच्या जन्मकथेने केली आहे. विल डय़ुरांट यांच्या मृत्यूनंतर ३३ वर्षांनी त्यांच्या अप्रकाशित लिखाणाचा 'शोध' लागून ते प्रकाशित झाले. भारतीय इंग्रजी दैनिकांनी दुर्लक्षच केलेले हे पुस्तक म्हणजे ६० वष्रे जगातील विविध संस्कृतींचा अभ्यास, चिंतन व त्यांची महाकथा लिहिल्यानंतर मांडलेले स्वतचे तत्त्वचिंतन आहे.. 

websites

संगमनेर महाविद्यालय संगमनेर, येथे मी सहयोगी प्राध्यापक आहे. तेथील विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट बनविली आहे. तत्त्वज्ञान  या विषयाची माहिती आणि विद्यार्थ्यांसाठी नोट्स हा या वेबसाईटचा  मुख्य उद्देश आहे. तथापि तत्त्वज्ञान हा विषय केवळ महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नाही. तो मूलतः सर्व लोकांसाठी आसतो.. त्यामुळे ही वेबसाईट सर्वासाठी आहे.. तिचा अनेकांना उपयोग होत आहे. मराठीतून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून देणारी ही एकमेव वेबसाईट आहे. 

ही माझी जुनी वेबसाईट आहे. येथे काही लेख, कथा इत्यादी  मिळतील. 

तत्त्वज्ञान विभाग संगमनेर महाविद्यालय संगमनेर
bottom of page